• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

संकेत सरगर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित

ड्रीम फाऊंडेशनच्या स्टार वेटलिफ्टरचा बहुमान

Nitin Phanse by Nitin Phanse
August 31, 2023
in फ्री हिट
0

ड्रीम फाऊंडेशनचा स्टार वेटलिफ्टर संकेत सरगर याला नुकत्याच पार पडलेल्या समारंभात ‘शिवछत्रपती पुरस्कार’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ड्रीम फाऊंडेशनच्या ‘ड्रीम गोल्ड’ या प्रतिष्ठेच्या अॅथलीट विकास कार्यक्रमाचा संकेत हा महत्त्वाचा घटक आहे. केवळ २२ वर्षीय संतोष महादेव सरगर याने याआधीच पुरुषांच्या ५५ किलोग्रॅम वजनगटात २५६ किलोग्रॅमचा राष्ट्रीय व राष्ट्रकुल विक्रम नोंदविला आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने एकूण २४८ किलोग्रॅम वजन उचलून रौप्यपदक पटकावले होते.

त्याआधी फेब्रुवारी २०२२ मध्ये सिंगापूर येथे पार पडलेल्या आशियाई पात्रता स्पर्धेतही त्याने (स्नॅच ११३ किलो व क्लीन अँड जर्क १४३ किलो)) असे एकूण २५६ किलो वजन उचलून राष्ट्रीय व राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. संकेतला मिळालेल्या शिवछत्रपती पुरस्कार हे त्याने केलेले अथक परिश्रम व सराव, तसेच इतक्या लहान वयात त्याची खेळावरील निष्ठा व गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्याने मिळविलेल्या यशाचेच फलित आहे.

शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना संकेत म्हणाला, मला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिल्याबद्दल आणि माझा बहुमान केल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शासनाला धन्यवाद देतो. माझ्यासाठी या पुरस्काराला खूप मोठा अर्थ आहे. मला आणखी खूप मोठी मजल मारायची असून या पुरस्कारामुळे त्यासाठी माझा निर आणखीनच बळकट होणार आहे. तसेच मला भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा मिळणार आहे. माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी ड्रीम फाऊंडेशन करीत असलेल्या साहाय्यासाठी मी त्यांचेही आभार मानतो. आगामी भविष्यात माझ्या कामगिरीत वेगाने सुधारणा करण्यासाठी आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यापेक्षाही भव्य यश मिळवून देण्यासाठी मला त्यामुळे निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

– संदेश कामेरकर

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

एक देश, एक दिवस, एक पिल्लू…

Next Post

एक देश, एक दिवस, एक पिल्लू...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.