अनेक चित्रपट, मालिका आणि टीव्ही शोजमुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे प्रसिद्ध आहे. त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षक कधी बोअर झालेत असं झालेलं नाही. मात्र यंदा तो आपल्या अभिनयामुळे नव्हे तर आपल्या फॅशन स्टाईलमुळे फेमस होणार आहे. एक खास सूट घातल्यामुळे तो खूपच डॅशिंग दिसतोय. त्याची ही फॅशन या वर्षात गाजणार हे स्पष्टच झाले आहे. नव्या वर्षात त्याने सोशल माध्यमांवर पहिलीच पोस्ट टाकली तीच भन्नाट आहे.
इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये तो एमराल्ड सूट परिधान केलेला दिसतोय. क्रीम रंगाचे टीशर्ट त्याच्या या सूटला खूपच सूट होतेय. त्यात संकर्षणने पिवळ्या रंगाचे शूज घातले आहेत. त्यामुळे त्याचा लुक क्लासी आणि ट्रेण्डी दिसतोय. त्याचा लुक पाहून त्याच्या महिला चाहत्या तर साफ पागलच होतील यात शंका नाही. या पोस्टमधल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, आता पुढचं शूट 2021 मध्ये… यावरून तो नव्या वर्षातल्या आपल्या कामगिरीसाठी किती उत्सुक आहे ते कळतेय. सध्या तो छोट्या पडद्यावर एका रिअलीटी शोचे सूत्रसंचालन करतोय. यासोबतच त्याच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.