महाराष्ट्रातील शेतकऱयांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यात जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात येईल. त्यासाठी 6 ते 20 जानेवारी या काळात पोलखोल यात्रा होईल. या यात्रेचा समारोप 20 तारखेला गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये होईल, अशी माहिती किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आली.
संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची बैठक आज नाशिकमध्ये आयोजित केली होती. गेल्या 40 दिवसापासून दिल्लीतील सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
या बैठकीत सांगलीचे संयुक्त किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे-पाटील, नाशिकचे इंजी शंकर दरेकर, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ, अमराकतीचे राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, लातूर येथील शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, नाशिकचे संघर्ष शेतकरी संघटनेचे हंसराज कडघुले, जळगाव येथील किसान क्रांतीचे एस बी नाना पाटील, नगर येथील राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे अरूण कान्होरे, नाशिकचे किसान क्रांतीचे योगेश रायते, अमोल गोरडे, पद्माकर मोराडे सहभागी झाले होते.
महाराष्ट्राला फायदा अधिक
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा महाराष्ट्रातील शेतकऱयांना पंजाब-हरयाणामधील शेतकऱयांपेक्षा जास्त फायदा होणार असून सध्या प्रचलित असलेल्या पध्दतीनूसार पंजाबमध्ये 80 टक्के अन्नधान्य किमान आधारभूत किंमतीने खरेदी करण्यात येते मात्र महाराष्ट्रात हेच प्रमाण 5 टक्के इतके आहे. शेतकरी आंदोलनातील किमान आधारभूत किंमतीचा कायदा तयार झाल्यास महाराष्ट्रातील किमान आधारभूत किंमतीने शेतमाल खरेदी करण्याचे प्रमाण 60 टक्केपर्यंत पोहोचेल.
सौजन्य : – दैनिक सामना