मुल्ला नसरुद्दीनचा मुलगा फजलू एका अंगणात खेळत होता…
एक सेल्समन आला आणि त्याने विचारलं, बेटा, तेरे अब्बा घरपे हैं क्या?
फजलू म्हणाला, आहेत, घरीच आहेत.
सेल्समन अंगणातून आत आला. बंद दार त्याने ठोठावलं. आतून काही प्रतिसाद आला नाही. पुन्हा ठोठावलं. पुन्हा प्रतिसाद नाही.
सुमारे १५ मिनिटंअशी वाट पाहिल्यावर तो पुन्हा फजलूपाशी आला आणि म्हणाला, बेटा, तू तर म्हणतोस अब्बा घरी आहेत. मग दरवाजा का नाही उघडत आहेत ते?
फजलू म्हणाला, ते हा दरवाजा कसा उघडतील. हे माझं घर नाही, हे एक पडीक घर आहे. माझं घर पलीकडच्या गल्लीत आहे!!!