अभिनेते मोहन गोखले व अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी म्हणजे सखी गोखले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेत साधीभोळी रेश्मा म्हणून ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. याच भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. यानंतरही तिने मालिका व नाट्यविश्वात स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. आई-बाबांसारखीच अभिनय क्षेत्राची आवड असणारी सखी एक उत्तम छायाचित्रकारही आहे. अनेकदा सखी गोखले आपल्या बाबांच्या आठवणीत भावूक होते. त्यांच्यासोबतच्या आठवणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करते.
आत्तासुद्धा सखीने तिच्या बालपणीचा एक सुरेख फोटो शेअर केलाय. सखीचा हा बालपणीचा गोडुला फोटो पाहून तिच्या चाहत्यांनीच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सखीने आपलाच सहअभिनेता सुव्रत जोशी याच्यासोबत गेल्याच वर्षी लग्न केले आहे. हे सेलिब्रिटी कपल आतापर्यंत लंडनमध्ये वास्तव्यास होते. सखी सोशल मिडीयावर सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा आपल्या आठवणींना उजाळा देते. सखी आपल्या पुढील शिक्षणाच्या निमित्ताने काही काळ लंडनमध्येच वास्तव्यास होती. त्यानंतर तिचा पती सुव्रत जोशीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात सखीसोबत होता. ही सेलिब्रिटी जोडी भारतात परतली आहे.