शेमारू टीव्ही वाहिनीवर पहिलाच सनसनाटी क्राईम शो ‘जुर्म और जज़्बात’ लवकरच सुरू होतोय. प्रेक्षकांची आवड लक्षात घेत शेमारू टीव्हीने या शोचे सूत्रसंचालन नामवंत कलाकार, एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता रोनित रॉय याच्यावर सोपवले आहे.
या नव्या अवतारात रोनित रॉय प्रत्येक गुन्ह्यामागे दडलेल्या भावनांचा पर्दाफाश करणार आहे. अनावर भावना एखाद्या सामान्य माणसालाही कसे गुन्हेगार बनवू शकतात ते या क्राईम शोमधून पाहायला मिळेल. सर्रासपणे घडणाऱ्या भयानक गुन्ह्यांमागे भावनांचा गुंता उलगडून दाखवणारा हा शो प्रेक्षकांना मानवी भावभावनांबद्दल विचार करण्यास भाग पाडेल हे नक्की.
हा शो सुरु होत असल्याचा आनंद व्यक्त करताना रोनित रॉय म्हणतो, हा शो माझ्यासाठी खास आहे. कारण तब्बल ५ वर्षांच्या कालावधीनंतर या शोमधून मी पुन्हा एकदा टीव्हीवर येतोय. त्याचबरोबर या शोमधली गुन्ह्यांमागे दडलेल्या भावनांवर प्रकाश टाकण्याची वेगळी संकल्पना मला खूप आवडली, असेही तो स्पष्ट करतो. हा क्राईम शो शेमारू टीव्हीवर २३ फेब्रुवारीपासून रात्री दहा वाजता सुरु झाला आहे