गेल्या तीन दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी प्रतीलिटरमागे 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहचले आहे. तर मुंबईत डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर आहेत.
तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझलेच्या किंमतीत वाढ केल्याने राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 84.95 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेलचे दर 75.13 रुपये झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 91.56 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 81.87 रुपये प्रतिललिटर झाले आहेत.
कोलकाता मध्ये पेट्रोलचे दर 86.39 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 78.72 रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 87.82 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 80.43 रुपये प्रतिलिटर झाले आहे. बंगळुरूत पेट्रोलचे दर 87.82 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 79.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
या वर्षात 1 जानेवारीपासून तीनवेळा पेट्रोल डिझलेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवरामध्ये आतापर्यंत पेट्रोल 1.24 रुपयांनी तर डिझेल 1.26 रुपयांनी महागले आहे. देशातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेत सकाळी 6 वाजता दर निश्चित करण्यात येतात. तीन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर सोमवारी या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सौजन्य : दैनिक सामना