‘सैराट’ या सुपरहीट सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळेच सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू बरेचदा आपले वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच एक खास व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओकडे चाहत्यांचं लक्ष वेधले गेलेय.
‘इनकम इनकम इनकम कावाले’ या प्रसिद्ध तेलुगू गाण्यावर रिंकूने हा छान व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत रिंकूच्या भन्नाट अदा पाहायला मिळत आहेत. रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. लवकरच ती ‘छुमंतर’ या दोन भाषांमधल्या सिनेमात दिसणार आहे. रिंकूने या सिनेमासाठी लंडनमध्ये जाऊन चित्रीकरणही पूर्ण केले आहे.