वेब विश्वासाठी गेलेले वर्ष कन्टेन्टच्या बाबतीत खूपच चांगले होते. यातच वूट सिलेक्टवरील काही वेब मालिकांचाही उल्लेख करता येईल. च्या शोजचा देखील समावेश होता. प्रशंसा झालेल्या ‘असूर’मधील काल्पनिक व विज्ञानाचे परिणाम किंवा दूरूनच डिजिटली शूटिंग करण्यात आलेली सिरीज ‘दि गॉन गेम’ किंवा मोठ्या पडद्याची जादू सादर करणारी सौम्य व गोंडस सिरीज ‘क्रॅकडाऊन’ अशा सर्वोत्तम सिरीजसह उच्च कन्टेन्ट दिल्यानंतर वूट सिलेक्ट या ओटीटी माध्यमावर येत्या वर्षात ‘कँडी’ ही ओरिजीनल वेबसिरीज सुरू होणार आहे.
यात रिचा चड्ढा आणि रोनित रॉय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजमध्ये मादक पदार्थ, राजकारण, महत्त्वाकांक्षा व हत्या यांचे सुरेख मिश्रण पाहायला मिळेल. याबाबत बोलताना रिचा चड्ढा म्हणाली, माझ्या भूमिकेतील वेगवेगळ्या छटा पाहून लगेच मी ही वेबसिरीज स्वीकारली. ही थ्रिलर आणि सायकोलॉजिकल हॉरर शैली माझ्यासाठी नवीन आहे. सखोलता असलेल्या भूमिका करायला मला आवडते. त्यामुळे ही वेबसिरीज माझ्यासाठी मोठी संधी होती. या वेब शोमध्ये मनु रिषी चड्ढा आणि नकुल सहदेव हेही प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्दर्शन आशिष आर. शुक्ला यांनी केले आहे.