• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

विद्यार्थ्यांमधील गणित, विज्ञानाची भीती घालवा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिक्षकांना सूचना

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 30, 2020
in घडामोडी
0
विद्यार्थ्यांमधील गणित, विज्ञानाची भीती घालवा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिक्षकांना सूचना

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे. या विपरीत परिस्थितीत विज्ञान व गणित यांसारखे कठीण समजल्या जाणाऱया विषयांची भीती विद्यार्थ्यांमधून घालवा. या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिक्षकांना दिल्या.

पुणे येथील सुपरमाईंड फाउंडेशन या संस्थेने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत‘ या विषयावर एका दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलते होते. परिसंवादात माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुपरमाईंड फाउंडेशनच्या संचालिका मंजूषा वैद्य, दया कुलकर्णी, शालेय शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते, डॉ. जयश्री अत्रे आदि सहभागी झाले होते.

एकलव्याप्रमाणे ध्येयप्राप्तीसाठी अभ्यास करा!

सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयांत चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा, या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना आज यशाचा मूलमंत्र दिला. ज्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत अशांपर्यंत देखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वनविभाग बिबट्याला जेरबंद केव्हा करणार? संतप्त नागरिकांचा सवाल

Next Post

“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते

Next Post
“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते

"बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत"- उदय मोहिते

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.