रणवीर सिंह आणि आलिया भट्ट ही जोडी जोया अख्तर यांच्या ‘गली बॉय’ या सिनेमात सर्वप्रथम प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. तेव्हा ही जोडी खूपच गाजली. या दोघांची केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली होती. हीच जोडी आता करण जोहर यांच्या नव्या सिनेमात पुन्हा एकत्र येतेय.
या दोघांनी कपण जोहर यांचा नवा रोमान्टिक सिनेमा साईन केल्याचे आज स्पष्ट झाले. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे 2016 साली ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाच्या दिग्दर्शनानंतर करण जोहर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसणार आहेत असे कळते. नव्या सिनेमाबाबत आणखी काही माहिती बाहेर आलेली नाही, पण हा सिनेमा याच वर्षी सुरू होणार आहे हे नक्की. ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ या सिनेमातून नंतर करण जोहर यांनीच आलियाला इंडस्ट्रीत लाँच केले होते.
त्यानंतर तिने धर्मा प्रॉडक्शनचे अनेक चित्रपट केले, पण करण जोहर यांच्या दिग्दर्शनाखाली ती दुसऱ्यांदा दिसेल. रणवीर सिंहबाबत म्हणायचे तर तो करण जोहर यांच्या दिग्दर्शनाखाली प्रथमच काम करणार आहे. मुळात ते एकमेकांचे दोस्त आहेत, पण दोघांनी आजतागायत एकत्र काम केले नव्हते.