• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रक्तदाब कमी जास्त होत असल्याने रजनीकांत रुग्णालयात दाखल

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 25, 2020
in घडामोडी
0

सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली होती.

रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून शूटींग करत होते. मात्र त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर शूटींग थांबविण्यात आले. त्यानंतर रजनीकांत यांची देखील चाचणी करण्यात आली मात्र त्यांची चाचणी निगेटीव्ह आली त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले होते.

 

Rajinikanth admitted to hospital this morning after showing severe fluctuation in blood pressure. He'll be investigated & monitored closely till his bp settles down before being discharged. He doesn't have any other symptoms & is hemodynamically stable: Apollo Hospital, Hyderabad pic.twitter.com/lQYPErCFRk

— ANI (@ANI) December 25, 2020

रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा जोक केला, अभिनेता झाला ट्रोल

सोशल मीडियावर अभिनेते रजनीकांत यांच्याशी निगडीत विनोद हे खरेतर नवीन नाहीत. प्रसंग कोणताही असला तरी त्यानुरुप रजनीकांत यांचे विनोद तयार होतात आणि खसखस पिकतेच. पण, कोरोनासारख्या गंभीर विषयावरून रजनीकांत यांच्यावर विनोद करणं एका अभिनेत्याला महागात पडलं होतं. कारण, नेटकऱ्यांनी या अभिनेत्याला ट्रोल केलं आहे. हा अभिनेता म्हणजे रोहित रॉय आहे. रोहित याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. त्यात अभिनेते रजनीकांत यांना कोरोना झाल्याचं म्हटलं होतं. त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनीही त्याला शाब्दिक फटके द्यायला सुरुवात केली.

देवी-देवतांचा अपमान थांबवा! रजनीकांत कडाडले

तमिळनाडूमध्ये एका धार्मिक गीताबाबत आक्षेपार्ह गोष्टी बोलत त्याचा अवमान करत टीका टीप्पणी करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी तमिळनाडू सरकारने ही टीका टीपण्णी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. रजनीकांत यांनी या कारवाईचे समर्थन करत सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. कंठ सष्टी कवसम या हिंदू धर्मियांच्या गीतावर टीका करणारा व्हिडीओ करूप्पर कूट्टम या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सरकारने हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांविरोधात कारवाई करत असतानाच हा व्हिडीओ देखील डिलीट केला आहे.

 

सौजन्य- सामना

Previous Post

‘लक्ष्मी’फेम अमिका नव्या वेबसिरीजमध्ये

Next Post

मास्कशिवाय फिरणारे रडारवर, आतापर्यंत आठ लाख जणांवर कारवाई

Next Post
मास्कशिवाय फिरणारे रडारवर, आतापर्यंत आठ लाख जणांवर कारवाई

मास्कशिवाय फिरणारे रडारवर, आतापर्यंत आठ लाख जणांवर कारवाई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.