शुक्रवारपासून देशात ख्रिसमसची धूम सुरू झाली. मराठी लोकांमध्येही नाताळचा उत्साह दिसतोय. सोशल मिडीयावर तर ख्रिसमस ट्रीच्या असंख्य पोस्ट्स आणि सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळत आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या उत्साहात नाताळ साजरा करताना दिसत आहेत. सगळेजण आपापल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासह ख्रिसमस साजरा करत आहेत.
‘बिग बॉस’ फेम पुष्कर जोगही ख्रिसमस साजरा करतोय. पुष्करची मुलगी फेलिशा हिला ख्रिसमस सण प्रचंड आवडतो. सगळ्याच छोट्या मुलांना नाताळ आवडतो. त्यांच्यासाठी मग आईबाबाही हा सण साजरा करतात. म्हणूनच पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलिशासोबत पुष्कर ख्रिसमस साजरी करतोय. यासाठी त्याने खास ख्रिसमस ट्री सजवला. त्याला लाल रंगाचे कपडे घालण्यात आले आणि फेलिशासाठी खास पांढऱ्या रंगाचा ड्रेस, असे सेलिब्रेशन करण्यात आले. फेलिशासोबत जास्मिन आणि पुष्करने डान्स करून खास व्हिडीओ केला आहे. पुष्करने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला. पुष्करचे चाहते त्याच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहेत.