गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवणाऱ्याला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 7 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुलफाम इरफान अन्सारी (वय 34, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस हवालदार उदय काळभोर आणि विनायक रामाने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रामवाडीत एकाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लपवून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने गुलफामला ताब्यात घेतले. त्याच्याकडील 1 लाख 7 हजारांचा आरएमडी व विमल कंपनीचा पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ गुटखा जप्त करण्यात आला.
ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, राजेश लोखंडे, उदय काळभोर, दिनकर लोखंडे , राजेश अभंगे, शाकीर खान, विनायक रामाने, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, कांबळे, गंगावणे यांच्या पथकाने केली.
सौजन्य : दैनिक सामना