- पाच खेळाडूंना कोटीहून अधिक रुपयांची बोली
- दोन दिवसांत ११८ खेळाडूंची विक्री
- पवन सेहरावत सर्वात महागडा खेळाडू
- इराणचा मोहम्मद शाडलुई सर्वात महागडा परदेशी खेळाडू
- इराणच्या फझल अत्राचेलीला परदेशी खेळाडूंत सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक बोली
- क गटातून अमिर मोहम्मद झफरदानेशला यु-मुम्बाकडून सर्वाधिक ६८ लाखाची बोली
- ड गटातून नितिन कुमारला बंगाल वॉरियर्सची ३२.२ लाखाची बोली
मुंबई १० ऑक्टोबर २०२३: प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वासाठी मशाल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खेळाडूंचा लिलाव मुंबईत ९ आणि १० ऑक्टोबर अशा दोन दिवस पार पडला. पवन सेहरावतला सलग दुसऱ्या वर्षी कोटीहून अधिक रकमेची बोली लागली. या वेळी तेलुगु टायटन्सने पवनसाठी २.६० कोटी रुपये मोजले. दोन दिवस चाललेल्या लिलावात १२ फ्रॅंचाईजी संघांनी ११८ खेळाडूंची खरेदी केली.
क गटात इराणचे वर्चस्व
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी क गटातील लिलावात इराणच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. अमिरमोहमंद झफरदानेश या गटातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यु-मुम्बाने त्याची ६८ लाख रुपयांना खरेदी केले. त्याच्या बरोबरीने इराणच्याच अमिरहुसेन बस्तमीला तमिळ थलैवाजने ३० लाख रुपयाला खरेदी केली.
ड गटात खेळाडूंना अधिक मागणी
लिलावाच्या ड गटातून खेळाडूंना सर्वाधिक मागणी मिळाली. या गटात नितिन कुमार सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. बंगाल वॉरियर्सने त्याला ३२.२ लाख रुपयांना खरेदी केले. मसानामुथु लक्षणन याला तमिळ थलैवाजने ३१.६ लाख रुपयांना खरेदी केले. पुणेरी पलटणने अंकितसाठी ३१.५ लाख रुपये मोजले.
लीगचे प्रमुख आणि मशाल स्पोर्ट्सचे अनुपम गोस्वामी म्हणाले, ‘कबड्डी लीगसाठी हा अलौकिक दिवस होता. दोन दिवसांच्या लिलावात काही विक्रमी बोली लागल्या. लिलावात पाच खेळाडूंसाठी एका कोटीहून अधिक रुपयांची बोली लागली. सर्वाधिक बोलीमध्ये सलग दुसऱ्यांदा भारताच्या पवनकुमारची वर्णी लागल्याचे पाहून खूप आनंद झाला. शाडलोऊला सुरुवातीला सर्वाधिक बोली लागली होती. पण, त्याचा विक्रम पवनने मोडला. सर्व फ्रॅंचाईजींनी सहकार्य केले असून, प्रत्येक जण खेळाडूंची अचूक निवड करून आपला संघ समतोल करतील. लीगचे हे पर्वही यशस्वी होईल आणि कबड्डीपटूंसाठी लीगचे व्यासपीठ अधिक व्यापक होईल.’
सर्वाधिक यशस्वी आणि आकर्षक चढाईपटू असलेल्या पवन सेहरावतला तेलुगु टायटन्सने २.६ कोटी रुपयांना खरेदी केले. मी खूप आनंदी आहे. संघासाठी जबाबदारी ओळखूनच मी खेळेन. एखादी फ्रॅँचाईजी खेळाडूसाठी इतका खर्च करते, तेव्हा हा खेळाडू आपल्याला विजेतेपदापर्यंत घेऊन जावे अशी त्यांची भावना असते. या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे पवनकुमार म्हणाला.
सर्वाधिक बोली लागलेला बचावपटू फझल अत्राचेली म्हणाला, गुजरातशी करारबद्ध होताना मी खूप आनंदी आहे. गुजरातचा संघ खूप चांगला आहे. पाचव्या पर्वात मी त्यांच्याकडून खेळलो आहे. खेळाडूंची काळजी कशी घ्यायची हे त्यांना चांगले समजते.
अ गटातील सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
मोहम्मद शाडलुई अष्टपैलू – २.३५ कोटी – पुणेरी पलटण
मनिंदर सिंग चढाईपटू – २.१२ कोटी – बंगाल वॉरियर्स
फझल अत्राचेली बचावपटू – १.६० कोटी – गुजरात जाएंटस
मनजीत चढाईपटू – ९२ लाख – पाटणा पायरटस
विजय मलिक अष्टपैलू ८५ लाख युपी योद्धाज
ब गट
पवन सेहरावत चढाईपटू – २.६ कोटी – तेलुगु टायटन्स
सिद्धार्थ देसाई चढाईपटू – १ कोटी – हरियाना स्टिलर्स
आशु मलिक चढाईपटू – ९६.२५ लाख – दबंग दिल्ली
मीतू चढाईपटू – ८३ लाख – दबंग दिल्ली
गुमान सिंग चढाईपटू – ८५ लाख – यु मुम्बा
क गट
अमिरमोहम्मद झफरदानेश अष्टपैलू – ६८ लाख – यु मुम्बा
राहुल सेठपाल बचावपटू – ४०.७ लाख – हरियाना स्टिलर्स
अमिरहुसेन बस्तमी बचावपटू – ३० लाख – तमिळ थलैवाज
हिमांशू सिंग चढाईपटू – २५ लाख – तमिळ थलैवाज
मोनू चढाईपटू – २४.१ लाख – बंगळुरु बुल्स
ड गट
नितिन कुमार चढाईपटू – ३२.२ लाख – बंगाल वॉरियर्स
मसानामुथु लक्षणन चढाईपटू – ३१.६ लाख – तमिळ थलैवाज
अंकित अष्टपैलू – ३१.५ लाख – पाटणा पायरट्स
फ्रॅंचईजींनी खर्च केलेली रक्कम
बंगाल वॉरियर्स – ४.९७ कोटी
बंगळुरु बुल्स – ४.७५ कोटी
दबंग दिल्ली – ४.९५ कोटी
गुजरात जाएंटस – ४.९२ कोटी
हरियाना स्टिलर्स – ४.६९ कोटी
जयपूर पिंक पॅंथर्स – ४.९९ कोटी
पाटणा पायरटस – ४.३९ कोटी
पुणेरी पलटण – ४.९७ कोटी
तमिळ थलैवाज – ४.०२ कोटी
तेलुगु टायटन्स – ४.९९ कोटी
यु-मुम्बा – ४.९९ कोटी
युपी योद्धाज – ४.७६ कोटी