प्रो कबड्डी लीगच्या आयोजक मशाल स्पोर्ट्सने जाहीर केले की प्रो कबड्डी स्पर्धेच्या दहाव्या हंगामासाठी 12-शहरांच्या कारवाँ फॉर्मेटमध्ये परत येईल. 2 डिसेंबर 2023 रोजी लीग सुरू होणार असल्याने प्रत्येक फ्रँचायझीचे चाहते या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या आवडत्या स्टार्सना त्यांच्या शहरात खेळताना पाहू शकतात.
PKL सीझन 10 च्या तारखांच्या घोषणेवर बोलताना, मशाल स्पोर्ट्स अँड लीग कमिशनर आणि हेड स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीग अनुपम गोस्वामी म्हणाले, “कबड्डी हा खेळ भारतातील लोकांना पाहायला आणि खेळायला आवडते यामुळेच प्रो कबड्डी लीगचा भारतभर प्रसार झाला आहे. PKL च्या मागील नऊ हंगामातील यशस्वी आयोजन केल्यावर. आता, दहाव्या आवृत्ती च्या नवीन हंगामात आम्ही खेळाचा विकास करण्यास आणि कबड्डीच्या भविष्याला आकार देण्यासाठी जगभरातून निवडलेल्या प्रतिभाशाली कबड्डी खेळाडूंना साजेसे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत. मागील वर्षात आमच्या लीगने कबड्डी खेळाचा एक वारसा तयार केला आहे. आणि या अविश्वसनीय प्रवासाचा भाग असल्याबद्दल आम्ही आमच्या खेळाडू आणि चाहत्यांचे तितकेच आभारी आहोत. येऊ घातलेला प्रो कबड्डी दहावा सीजन हा अधिक रोमांचकारक आणि संस्मरणीय असेल.
प्रो कबड्डी लीग सीझन 10 चा लिलाव 8 ते 9 सप्टेंबर 2023 दरम्यान मुंबईत होणार आहे. लीग आगामी आठवड्यात माइलस्टोन हंगामासाठी अधिक तपशील सामायिक करेल. मशाल स्पोर्ट्स आणि डिस्ने स्टार, अॅमॅच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) ने PKL ला भारतातील सर्वात यशस्वी क्रीडा लीग बनवले आहे. भारतातील सर्व व्यावसायिक क्रीडा लीगमध्ये सर्वाधिक सामन्यांसह, प्रो कबड्डी लीगने भारतातील आणि जगभरातील असंख्य कबड्डी खेळाडूंचे जीवन बदलून टाकले आहे.