‘टकाटक’ या सुपरहीट मराठी सिनेमामुळे अभिनेत्री प्रणाली भालेराव हिला भन्नाट लोकप्रियता मिळाली आहे. लवकरच ती बॉलीवूड अभिनेता आर्य बब्बर याच्यासोबत एका हिंदी सिनेमात दिसणार आहे. तिच्या या सिनेमाचे शूटिंग जोरात सुरू असतानाच आर्य बब्बरसोबत सेटवर घालवलेले निवांत क्षण दाखवणारे काही फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर शेयर केले आहेत. आर्य बब्बरही या फोटोत रिलॅक्स मूडमध्ये दिसतोय.
‘…आणि आम्ही चित्रीकरण सुरू केले’ अशा शब्दांत प्रणाली भालेरावने आपल्या या चार फोटोंना कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनची अखेर तिने बऱ्याच हॅशटॅग्सने केली आहे. प्रणालीच्या पहिल्याच ‘टकाटक’ या सिनेमात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या या पहिल्याच भूमिकेतूनही तिने ती किती चांगली अभिनेत्री आहे ते प्रेक्षकांना दाखवून दिले होते.