अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच आपल्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केले. जुन्नरमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होते. प्राजक्ताने शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती आज सोशल मिडीयावर दिली आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी अभिनेता अंकुश चौधरीसोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच लोकांसमोर येतेय. लॉकडाऊनच्या धर्तीवर ‘लकडाऊन’ असे या सिनेमाचे नाव असून त्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले.
प्राजक्ताने एक खास पोस्ट टाकत ही माहिती दिलीये. या पोस्टमध्ये तिने सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही शेयर केलेत. पोस्टमधील आपल्या कॅप्शनमध्ये प्राजक्ता म्हणते, ‘…आणि हे पूर्ण केले. धन्यवाद इष्णव मिडीया माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी… धन्यवाद संतोष मांजरेकर मला स्वातंत्र्य देण्यासाठी… धनंजय कुलकर्णी सतत कुल स्माईलसाठी धन्यवाद… फुलवा तुलाही खूप प्रेम… आणि मी अंकुश चौधरीचे कसे धन्यवाद करू? खूप उदार आणि मैत्रीपूर्ण को-स्टार असण्यासाठी? लकडाऊनच्या सेटवर मी खूप खूप आरामदायी होते… आणि शेवटचं म्हणजे जुन्नरमध्ये असणं आवडलं.’