• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

संस्कारांची किंमत बिनमोल

सचिन परब by सचिन परब
December 29, 2020
in इतर
0
संस्कारांची किंमत बिनमोल

मातोश्री हा शब्द महाराष्ट्रात ठाकरे घराण्याशी जोडला गेलाय. तो मातृशक्तीचा सन्मान आहे. ठाकरे घराण्याला हा धडाही प्रबोधनकारांनीच घालून दिलाय. त्यांच्या आयुष्यात, साहित्यात आणि कर्तृत्वात या मातृसन्मानाला मोठं स्थान आहे. आईच्या संस्कारांनी त्यांना घडवलंय. ते संस्कार आजही अमूल्य आहेत.

`आई हा एक असा चमत्कार आहे की त्याच्या निकट परिचयामुळे त्यातील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्त्व आम्हाला वास्तविक समजले तरी उमजत नाही, उमगले तरी सापडत नाही व भासले तरी व्यक्त करता येत नाही. आई हे दोन स्वर, ही दोन अक्षरे, हा एक सुटसुटीत शब्द सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेत सारे विश्व सामावलेले आहे. या शब्दात एक विलक्षण जादू आहे. विश्वाच्या आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दातच संकलित झाली आहे.’

-प्रबोधनकार ठाकरे, `आई थोर तुझे उपकार’

पुण्यातून `प्रबोधन’ सुरू असताना प्रबोधनकारांनी त्यातल्या लक्षवेधी लेखांच्या छोट्या पुस्तिका काढल्या. त्यांचा स्वतःचा छापखाना असल्यामुळे पुस्तकांचं प्रकाशन हा त्यांच्या व्यवसायाचाही भाग होता. अशा पुस्तकांची `प्रबोधन नवमतवादी पुस्तकमाला’ १९२०च्या दशकात खूप गाजली. त्यात एका मातृदिनानिमित्त `आई थोर तुझे उपकार’ ही पुस्तिका प्रबोधनच्या वाचकांसाठी प्रकाशित केली. विशेष म्हणजे या पुस्तिकेवर लिहिलंय, `किंमत – बिनमोल’. तळहातापेक्षा थोड्याच मोठ्या आकाराची ही पुस्तिका झटकन वाचून होते. ती वाचताना लक्षात येतं की प्रबोधनकारांची भाषा किती सहजपणे तेव्हाच्या वाचकांच्या मनाचा ठाव घेत असेल. आणि आपल्या मनाचा ठाव घेतं, ते प्रबोधनकारांचं आईविषयीचं निर्व्याज प्रेम.

हे प्रेम सहाजिकच म्हणायला हवं, कारण प्रबोधनकारांच्या जडणघडणीत त्यांच्या आईचं योगदान फार महत्त्वाचं आहे. ती पनवेलचे तेव्हाचे प्रसिद्ध वकील बाबा पत्की यांची मुलगी. पत्की श्रीमंत आणि ठाकरे तुलनेने खूपच गरीब. पण साधुत्व आणि सेवेमुळे सासूसासर्‍यांचा पनवेलात दबदबा होता. त्यात पत्रिका जुळली. श्रीमंत वाड्यातली काशी ही जानकी सीताराम ठाकरे बनून चंद्रमौळी झोपडीत आली. तिचा स्वभाव अतिशय स्वाभिमानी होता. स्वाभिमानासमोर तिने कधी कुणाची पर्वा केली नाही. तिला खोट्याची, ढोंगाची, अहंकाराची चीड होती. मुलांमधे या गोष्टी दिसल्या तर ती त्यांना झोडून काढत असे. पण इतरही कुणी चुकीचं वागलं तर त्याला सुनावल्याशिवाय राहायची नाही. प्रबोधनकार तिला ताई म्हणत आणि सगळं पनवेलही.

ताईची शिस्त घरात सगळ्यांनाच पाळावी लागत असे. छोट्या केशववर तिची बारीक नजर असे. वाह्यातपणा आणि अभ्यासाची हयगय तिला बिलकूल चालत नसे. परीक्षेत कमी मार्कही तिला चालत नसत. रोज अक्षर सुधारण्यासाठी अर्धा पाऊण तास लेखन करावं लागे.

शिवाय रोज शाळा सुटल्यावर वाचनही. ताईने शेजारपाजारहून महत्त्वाची वर्तमानपत्रं गोळा करून ठेवलेली असत. त्यात `दैनिक मुंबई वैभव’ असायचं. शिवाय `इंदूप्रकाश’, `करमणूक’, `केरळकोकीळ’, `जगत्समाचार’ अशी नियतकालिकंही असायची. ती केशवला मोठमोठ्याने वाचावी लागत. वाचताना ताई कठीण शब्दांचे अर्थ सांगायची. शब्दोच्चार, आरोह अवरोह यावर तिचं लक्ष असायचं. उच्चार चुकला की डावा गाल लाल व्हायचा.

त्यातून फक्त सात वर्षांचा असल्यापासूनच छोट्या केशवला वर्तमानपत्रांची आवड लागली आणि एक महान संपादक घडला. प्रबोधनकार आत्मचरित्राच्या सुरवातीलाच आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास नीट आठवत असल्याचं श्रेय या वृत्तपत्रवाचनाला देतात. त्या आधारेच त्यांनी `जीवनगाथे’त स्वतःच्या आठवणींच्या निमित्ताने महाराष्ट्रीय समाजातल्या स्थित्यंतराच्या आठवणीही सांगितल्या आहेत.

प्रबोधनकारांना व्यसनं दोनच. एक तपकीर आणि दुसरं बूकबाजी म्हणजे पुस्तकांचं वेड. वाचनाचं हे व्यसन त्यांनी आयुष्यभर तब्येतीत जपलं. जगभरातली पुस्तकं वाचली आणि परवडत नसतानाही विकत घेतली. वाचनाच्या बळावरच त्यांनी स्वतःला घडवलं. जगाला शिंगावर घेतलं. त्याचं श्रेय आपण ताईलाच द्यायला हवं. पण या पुस्तकांच्या छंदामुळे त्यांच्यावर लहानपणी एक संकट आलं.

पनवेलच्या करमअलीशहाच्या दर्ग्याचा दरवर्षी मोठा उरूस भरायचा. त्यात पुस्तकांच्या सोडतीची दुकानं लागायची. पुस्तकांच्या नावांच्या चिठ्ठ्या असत. दीड पैशात एक चिठ्ठी काढता यायची. चिठ्ठीवर जे नाव असेल, त्या नावाचं पुस्तक मिळायचं.

एकदा छोट्या केशवला दीड पैशात दोन रुपयांचं जाडजूड रंगीत पुस्तक मिळालं. ती अश्लील लिखाण असणारी `सुंदर स्त्रियांची सुंदर कहाणी’ ही कादंबरी होती. ती ताईला सापडली. तिने दुसर्‍या दिवशी सकाळीच ती केशवसमोर चुलीत जाळली आणि दम दिला, `अशा कादंबर्‍यांचं पुस्तक हातात धरलंस तर तुलाही असाच चुलीत जाळीन समजलास!’

पण एकदा ताईनेच एक कादंबरी केशवला वाचनासाठी आणून दिली. ती होती ह. ना. आपटेंची सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारी `पण लक्षात कोण घेतो? `प्रबोधनकार म्हणतात सगळ्यात आधी या कादंबरीमुळेच त्यांचं लक्ष सामाजिक प्रश्नाकडे गेलं. तरीही ताईने प्रबोधनकारांना जाळण्याच्या दिलेल्या धमकीमुळे ते आयुष्यभर कादंबरीपासून लांबच राहिले. त्यांनी कधी कथाकादंबर्‍या लिहिल्या नाहीतच, पण फारशा वाचल्याही नाहीत.

एकट्या प्रबोधनकारांवरच नाही तर सगळ्या ठाकरे घराण्यावर संस्कार करणारी एक घटना ताईच्या स्वाभिमानी शिस्तीशी जोडलेली आहे. ब्रिटिश सरकार आल्यानंतर लॉटर्‍या सुरू झाल्या. तेव्हा गोंडल लॉटरीचा गाजावाजा सुरू होता. गोंडल हे आता गुजरातमधे असलेलं एक संस्थान होतं. तिथून चालवली जाणारी ही लॉटरी होती. पहिलं बक्षीस एक लाखाचं होतं. एक लाख तेव्हा खूपच मोठी रक्कम होती. तेव्हा त्याची विक्री खूप झाली. प्रबोधनकारांच्या आजीने म्हणजे बयनेही मुलांच्या शिक्षणाची सोय होईल, या हेतूनं चार भावंडांच्या नावाने एकेक रुपयाची चार लॉटरी तिकीटं काढली. मात्र गोंडल लॉटरीची चर्चा सुरू झाली होती तशीच अचानक बंद पडली. तिची सोडतही कुणाला कळली नाही. सरकार दरबारी तक्रारी गेल्या. चौकशी झाली. लॉटरीवर जप्ती आणली. सोडतीचा निकाल आधीच लागला होता. लॉटरीवाल्यांनी जवळपासच्या भागातली बक्षिसं वाटली होती आणि इतर आपापसात वाटून टाकली.

लॉटरीच्या कागदपत्रांची तपासणी करताना लक्षात आलं की एक लाख रुपयांचं पहिलं बक्षीस `केशव सीताराम ठाकरे, पनवेल’ या नावाला लागलं होतं. सरकारला सापडलेल्या रकमेची वाटणी करताना केशवच्या म्हणजे प्रबोधनकारांच्या नावाला फक्त ७५ रुपये आले. ते पनवेलच्या मामलेदार ऑफिसात वाटपासाठी आले. प्रबोधनकारांच्या वडीलांनी ते सही करून घेतले. धड पंधरा रुपयेही पगार नसणार्‍या घरात एकरकमी ७५ रुपये हा मोठाच धनलाभ होता. त्याचं पूर्ण पनवेल गावात कौतुक होत होतं. शेजारीपाजारीही त्याचं कौतुक करत घरी आली.

मात्र एकट्या ताईला हे सगळं मान्य नव्हतं. ताईने सगळ्यांसमोर आपला निषेध नोंदवला. तो प्रबोधनकारांच्या शब्दातच मांडायला हवा, `एक रुपयाच्या बदली ७५ आले. वरचे ७४ रुपये काय त्या सोडतवाल्यांनी आपल्या पदरचे घातले होय? इतर ७४ जणांना लुटले नि ही भर केली. ते आता तडफडत असतील. अगदी एक लाखाचे बक्षीस मिळाले असते, तरी आमच्या घरात नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांचे तळतळाट आले असते समजलात? पैशाचा असला मोह काही यशाला जात नसतो. अंगमेहनत करावी, बुद्धी घासावी नि मिळेल ती चटणी भाकर निर्धास्त खावी. हा कसला जुगारीचा छंद नि त्याचे काय एवढे कौतुक करायचे?’

हे बिनमोल किमतीचे संस्कार होते. आपल्याला हरामाची कमाई नको, फक्त कष्टायचीच हवी, या ताईच्या आग्रहाने ठाकरे घराण्यात प्रामाणिकपणाच्या मूल्याची पेरणी केली. ठाकरेंना आदर्श मानणारं कुणीही खंडणी, हप्ता, प्रोटेक्शन मनी किंवा इतर कोणत्याही मार्गाने बिनकष्टाचं खात असेल, तर ते ठाकरे घराण्याला घडवणार्‍या मूल्याशी प्रतारणा करतंय, हे धरून चालावं. सलग अनेक पिढ्यांनी प्रामाणिकपणाची साधना केली म्हणून आज ठाकरे महाराष्ट्राच्या सत्तेच्या सर्वोच्च स्थानी आहेत. त्यात प्रबोधनकारांच्या आईंचं योगदान सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रबोधनकारांनीच तसं लिहून ठेवलंय, `आज आम्ही ठाकरे ज्या सामाजिक, बौद्धिक नि सार्वजनिक पातळीवर आहोत, त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीच्या कर्तबगार नि कडकडीत शिस्तीला आहे.’

Previous Post

ड्रायव्हर नाही, टेन्शनही नाही! दिल्लीत धावू लागली पहिली स्वयंचलित मेट्रो

Next Post

रहाणेने ठोकलेल्या प्रत्येक शतकावेळी टीम इंडिया ‘अजिंक्य’!

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
चला खाऊया!

फ्राईड राईस

May 15, 2025
गावगप्पा

नाठाळ पक्याचं करायचं काय?

May 15, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 15, 2025
Next Post
रहाणेने ठोकलेल्या प्रत्येक शतकावेळी टीम इंडिया ‘अजिंक्य’!

रहाणेने ठोकलेल्या प्रत्येक शतकावेळी टीम इंडिया ‘अजिंक्य’!

पोस्टाच्या तिकिटावर छोटा राजन, गँगस्टर मुन्ना बजरंगीचे फोटो

पोस्टाच्या तिकिटावर छोटा राजन, गँगस्टर मुन्ना बजरंगीचे फोटो

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.