मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱयांची आता खैर केली जाणार नाही. पालिका कर्मचाऱयांना न जुमानता सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांमध्ये झोपडपट्टी भागात राहणाऱया लोकांचा समावेश जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर, त्यांना रोखण्यासाठी झोपडपट्टी भागांमध्ये पोलिसांच्या गाडीतून पालिकेचे पथक कारवाई करणार आहे.
आतापर्यंत 3 लाख 98 हजार लोकांवर कारवाई!
विनामास्क घराबाहेर पडणार्यांवर पालिकेचे पथक कारवाई करत असते. यासाठी पालिकेच्या 24 वॉर्डापैकी प्रत्येक वॉर्डात 90 जणांची टीम कार्यरत आहेत. दिवाळीत ही संख्या वाढवण्यात आली होती. आतापर्यंत 3 लाख 98 हजार 824 लोकांवर कारवाई करत 8 कोटी 33 लाख 76 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
सौजन्य : दैनिक सामना