विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला जबरदस्त निर्णय घेतले. त्याने घेतलेल्या निर्णयावर दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ व टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रहाणेने पहिल्या सत्रात गोलंदाजांचा योग्य प्रकारे वापर केला तसेच क्षेत्ररक्षणही जबरदस्त लावले होते त्यामुळे या दिग्गजांनी त्याच्या ‘गोलंदाजीमध्ये जबरदस्त बदल , फिल्डिंगमध्येही अजिंक्य रहाणेने योग्य ठिकाणी खेळाडू लावले. गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. बुमराह, अश्विन, सिराज यांच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखता आले. आता फंलदाजांनी त्यांची पहिली इनिंग चांगली खेळायची आहे’, असे विरेंद्र सेहवाग याने ट्विट केले आहे.
तर ग्लेन मॅकग्राथ याने देखील सोनी मॅक्सवर बोलताना रहाणेची स्तुती केली आहे. ‘रहाणने आजच्या सामन्यात मस्त कामगिरी केली. त्याने गोलंदाजांना सपोर्ट केला. त्याने क्षेत्ररक्षणही जबरदस्त लावले होते. चार स्लिप व एका गलीला खेळाडू उभे होते. जसा स्मिथ फलंदाजीला उतरला त्याने ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्यासाठी बुमराहला परत आणले. मला वाटतं त्याने खूप चांगल्या प्रकारे कॅप्टन्सी निभावली’, असे मॅकग्राथने सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना