छोट्या पडद्यावरील ‘कसौटी ज़िंदगी की’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता पार्थ समथान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पिहरवा’ या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांनी त्याला करारबद्ध केलंय. टीव्हीवर पार्थ एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळेच त्याला ऑस्कर विजेता रेसुल पूकुट्टी यांचे बॉलीवूड पदार्पण असलेल्या ‘पिहरवा’ सिनेमात आलियासोबत संधी देण्यात आल्याचे म्हटले जातेय. हा सिनेमा शहीद बाबा हरभजन सिंग यांच्या जीवनावर बेतलेला आहे. ते चीन-भारत युद्धात शहीद झाले होते.