सोनी मनोरंजन वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘सरगम की साढेसाती’ या मालिकेत आता अभिनेता पंकज बेरी याचीही एण्ट्री झाली आहे. तो एका बाबाच्या भूमिकेत दिसेल, जो अपारशक्तीच्या कुंडलीत असलेल्या दोष दूर करण्यासाठी अवस्थी परिवाराला मदत करेल. पंकज बेरीची बाबाची भूमिका मालिकेतील रंगत आणखी वाढवेल यात शंका नाही. याबाबत तो म्हणतो, प्रेक्षकांना दररोज हसवणार्या या मालिकेचा भाग होताना मला खूप आनंद होतोय. ही मालिका माझ्यासाठी जणू वरदानच आहे, कारण यात नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकार मिळून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. हे सगळेच कलाकार लाघवी आहेत. यात मी साकारत असलेली बाबाची व्यक्तिरेखा या मालिकेस अधिक रंगतदार करेल. मला खात्री आहे, प्रेक्षक माझ्या या भूमिकेलाही तेच प्रेम देतील, जे यापूर्वीच्या माझ्या भूमिकांना त्यांनी दिले आहे, असेही तो सांगतो.