महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची येत्या काही वर्षात उत्तम मैत्री झाली तर भविष्यातील निवडणुकांमध्ये मतविभाजन टळून या आघाडीतील तीनही पक्षांचा फायदा होईल. या उलट भाजप एकाकी पडेल आणि स्वबळावर या तीन पक्षांसमोर तिची ताकद कमी होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळेच भाजपला कोणत्याही परिस्थितीत या तीन पक्षांची दोस्ती टिकू द्यायची नाही. केवळ आता सत्ता पाहिजे म्हणून नव्हे तर या तीन पक्षांच्या एकीमुळे भविष्यात भाजपची वाढ खुंटेल किंवा पक्षाची ताकद घटेल, हे लक्षात आल्याने भाजपची हे सरकार पाडण्यासाठी धावाधाव सुरू आहे; पण हा त्रिवेणी संगम अढळ आणि अटळ आहे.