नववी ते बारावीच्या राज्यातील 87.9 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. 23 नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्यापासून नवीन वर्षात 4 जानेवारीपर्यत विद्यार्थी उपस्थितीची संख्या 15 लाखांवर पोहोचली आहे. मुंबई आणि ठाणे वगळता इतर जिल्ह्यातील 19 हजार 524 शाळा सद्यस्थितीत सुरू आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण 27.8 टक्के आहे.
राज्यातील शाळामंधील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढले असले तरी एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ते कमीच आहे. राज्यात नववी ते बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 56 लाख 48 हजार 28 इतकी आहे तर शाळेत हजर राहणारे विद्यार्थी केवळ 15 लाख 70 हजार 807 इतकेच आहेत. राज्यातील 22 हजार 204 शाळांपैकी 19 हजार 524 शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण नगण्यच आहे.
सर्वाधिक उपस्थितीचे जिल्हे
कोल्हापूर 1,44,919