पोस्टात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी ही भरती निघाली आहे. भरतीविषयक अधिक माहिती आणि अर्ज www.indiapost.in या अधिपृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पोस्ट खात्याच्या जाहिरातीप्रमाणे, स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी 12 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यापैकी 4 पदे ओबीसी आणि 1 पद एससी, एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. संबंधित उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून उत्तीर्ण होणाऱया उमेदवारांची या पदासाठी नियुक्ती केली जाईल. निवड होणाऱया उमेदवारांना 19,900 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ’द सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, एस.के.अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400018’ या पत्त्यावर 10 मार्चपर्यंत पाठवावेत. अधिकाधिक भूमिपुत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष अजय माने यांनी केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना