ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus)चा नवा वेरिएंट (New Coronavirus Strain) अधिक वेगाने पसरत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटेनमध्ये लॉकडाउन (Lockdown) ची घोषणा करण्यात आली आहे. व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने अनेक देशांची चिंता वाढली आहे.
यादरम्यान, वैश्विक आरोग्य संघटना WHO ने स्पष्ट केले आहे की, ब्रिटेनमध्ये आढळलेला कोरोना व्हायरसचा नवा प्रकार अजूनही नियंत्रणा बाहेर गेलेला नाही. सध्याच्या उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. मात्र हे निश्चित आहे की व्हायरसच्या नव्या स्ट्रेनच्या प्रसाराचा वेग (Transmission Rate) अधिक आहे.
WHO च्या आपत्तीकालीन विभागचे प्रमुख माइक रेयान यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, “कोरोना साथरोग अनेक ठिकाणी आम्ही यापेक्षा अधिक भयंकर परिस्थिती पाहिली आणि त्यावर नियंत्रण मिळवले आहे.” ते म्हणाले, “हे लक्षात घेता ब्रिटनमधील स्थिती नियंत्रणात आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”
ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दावा केला आहे की, व्हायरसचा नवा वेरिएंट अत्यंत भयंकर असून त्यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण आहे. ब्रिटिश अधिकारिऱ्यांचे म्हणणे आहे की, व्हायरसचा नवा स्ट्रेन COVID च्या मुख्य स्ट्रेन तुलनेत 70 पटीने अधिक वेगाने पसरतो.
मात्र WHO चे अधिकारी रेयान म्हणाले की, ‘ही स्थिती नियंत्रणा बाहेर गेली असे म्हणता येणार नाही. सध्या आपण जे उपाय करतो ते याला नियंत्रणात आणण्यास पुरेसे आहेत. मात्र ते तात्काळ बंद करून चालणार नाही. दीर्घकाळासाठी हे उपाय लागू केल्यास स्थिती नियंत्रणात राहील.’
सौजन्य- सामना