बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात नेहमीच प्रेक्षकांसमोर वावरणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे हिला ओळखले जाते. नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी हीच अभिनेत्री नेहा पेंडसे-बयास आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. आतासुद्धा नेहाने पांढऱ्याशुभ्र साडीतले एक रॉयल आणि जबरदस्त फोटोशूट शेअर करत तिने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे… नेहाच्या या अदा पाहून तिचे चाहते नक्कीच तिच्यावर फिदा होतील. अनेक क्लोदिंग ब्रॅण्ड्स आपल्या जाहीरातीसाठी नेहाला पसंती देताना पाहायला मिळतात. प्रत्येक लुकमध्ये नेहा खासच दिसतेय हे कुणीही सांगेल.