ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. सोशल मीडियावरही त्या भलत्याच अॅक्टीव्ह असतात. आपल्याबाबतचे अपडेट्स त्या इन्स्टाग्रामवर सतत देत असतात. आताही त्यांनी या मालिकेत त्या नऊवारीत तलवारबाजी करत आहेत असा सेटवरील व्हिडीओ टाकत चाहत्यांना चकीतच केले आहे. मुळात ही तलवारच किमान 5 किलो वजनाची आहे. ती घेऊन नऊवारी साडीचा बाज सांभाळत त्या तलवारबाजी करत आहेत ते पाहून धक्काच बसतो. या मालिकेतील शिर्षक भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये ‘लढाईस सज्ज मी’ असे म्हणत सोनी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत. जिजामाता या प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांच्या मातोश्री. त्या भूमिकेत नीना कुलकर्णींना पाहून प्रेक्षक, चाहतेही खूष झाले आहेत. त्यांच्या स्तुतीपर मेसेजेसवरून हे स्पष्टच दिसते.