राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा व कोविड परिस्थितीत आरोग्य कर्मचारी व परिचारिकांच्या समस्या व उपाययोजनांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत.
साथी संस्था पुणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान यांच्या वतीने महाराष्ट्रातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयावर व कोविडच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिका यांच्यासंदर्भात सोमवार, 7 डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी 11.00 वा वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास हे ही सहभागी होणार आहेत. आरोग्यावर काम करणारी पुणे येथील साथी संस्था यांनी कोविड कालावधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱयांना आलेल्या अनुभवावर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालावर सादरीकरणही होणार आहे.
सौजन्य- सामना