नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना महत्त्काच्या सूचना देण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ब-यापैकी ऍक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चर्चा होत असते. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मिम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीस सर्वसामान्यांना जागरूक करत असतात. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी केलेले अधिकृत ट्विटर हॅण्डलवर केलेली पोस्ट सध्या चर्चेत असून जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांच्या आयडियाच्या कल्पनेचे नेटिझन्सकडून कौतुक होत आहे.
Da Vinci Code of ‘Safety’ !#RoadSafetyWeek #WearSeatbelt pic.twitter.com/RT9A2dCnnX
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 12, 2021
नागरिकांना सीट बेल्टचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई पोलिसांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलकरून चक्क कारमध्ये बसलेल्या मोनालिसाचा फोटो शेअर केला असून यात मोनालिसाने चक्क सीट बेल्ट घातल्याचे दिसतेय. यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलंय, ‘द विंची कोड ऑफ सेफ्टी. सुरक्षेचा कोड शोधून काढणे तेवढे कठीण नाही- फक्त वाहन चालवताना सीटबेल्ट लावा!’ मुंबई पोलिसांच्या या क्रिएटिव्हिला नेटिझन्सने सलाम केला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. काहींनी ‘अद्भुत क्रिएटिव्हीटी’ म्हणत मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
सौजन्य : दैनिक सामना