कोरोनामुळे यंदा सर्वच उत्सवांवर निर्बंध आले. यातून मुंबईत दरवर्षी निघणाऱया पांडुरंगाच्या पालखी सोहळय़ाचीदेखील सुटका झालेली नसून श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी कॉटनग्रीन ते वडाळा पालखी सोहळादेखील यंदा मर्यादित स्वरूपातच साजरा करण्यात आला असून यानिमित्ताने विठुरायाचा गजर यानिमित्ताने मुंबईत दुमदुमला.
गेल्या 20 वर्षांपासून श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने मुंबईत श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळा आयोजित केला जातो. या पालखी सोहळय़ात हजारो वारकरी सामील होतात. यंदा मात्र कोरोनामुळे हा पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय महासमितीच्यावतीने घेण्यात आला. त्यानुसार काही मर्यादित भक्तांच्या व प्रतीकात्मक स्वरूपात बसमध्ये पालखी घेऊन कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा असा पालखी सोहळा संपन्न झाला.
या पालखी सोहळय़ाच्या निमित्ताने कॉटनग्रीन येथील राम मंदिरात पार पडलेल्या विशेष सोहळय़ात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, नगरसेवक सचिन पडवळ, संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्राr उपस्थित होते. तर वडाळा येथील मंदिरात पार पडलेल्या आरती सोहळय़ात खासदार राहुल शेवाळे, श्रद्धा जाधव, स्थापत्य समिती अध्यक्ष व नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.