मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर करण्याची क्षमता असलेल्या मुंबई नागरी वाहतूक (एमयूटीपी ) प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये 670 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाने 550 कोटी रूपये मंजूर केले होते. यंदा मुंबईला 120 कोटी रूपये अतिरिक्त मिळाले आहेत. यामुळे हार्बरमार्गाचा बोरीवलीपर्यंत विस्तार करणे, विरार-डहाणू चौपदरीकरण, वातानुकुलित लोकलची संख्या वाढविणे आदी प्रकल्पांना चालना मिळणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग ताशी 160 कि.मी. वेगाने मेल-एक्स्प्रेस धावण्यासाठी आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये 8080 कोटींच्या एमयूटीपी टप्पा क्र.2 साठी 200 कोटी रूपये, 10,085 कोटी रूपयांच्या एमयूटीपी टप्पा क्र.3 साठी 300 कोटी रूपये तसेच 33,000 कोटी रूपयांच्या एमयूटीपी टप्पा क्र.3 (अ)करीता 150 कोटी s. तसेच बेलापूर-सीवूड-उरण दुपदरी मार्गासाठी 20 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून एपूण अशी एमयूटीपी प्रकल्पांसाठी 670.80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेला 4,830 कोटींचा निधी
मध्य रेल्वेला रेल्वे अर्थसंकल्पात 4,830 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा दहा टक्के जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सात ठिकाणच्या उड्डाण पुलांसाठी 33 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तर 115 सरकत्या जिन्यांसाठी 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेला उड्डाण पुलांसाठी 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुपदरीकरण तिसरी आणि चौथी मार्गिका
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प – 7897 कोटी
मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग सक्षमीकरण – 1340 कोटी
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका 67 कि.मी.- 168.24 कोटी
वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका 132कि.मी.- 146 कोटी
पुणे-मिरज-लोंढा दुपरीकरण 467 कि.मी.- 555 कोटी
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका 78.70 कि.मी.- 185 कोटी
मनमाड-जळगाव तिसरी मार्गिका 160कि.मी.-200कोटी
दौंड-मनमाड दुपदरीकरण- 247 कि.मी.-85 कोटी
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका 24.46 कि.मी. – 40 कोटी