कोविडचा प्रादुर्भाव पाहता मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 14 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान आठवडय़ातून दोन दिवस ऑनलाईन सुनावणी होणार आहे. तशी नोटीस हायकोर्टाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकिलांनीसुद्धा ऑनलाईन सुनावणी घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना विनंती करत त्यांना त्याबाबत पत्र लिहिले होते.
सौजन्य- सामना