साठी नदी, नाले यांच्या 292 किलोमीटरच्या साफसफाईच्या कामांना महापालिका फेब्रुवारी अखेरीपासून सुरुवात करणार आहे. पावसाळ्यापूर्वी 75 टक्के, पावसाळ्यात 15 तर पावसाळ्यानंतर 10 टक्के नालेसफाई केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेकडून एकूण 100 टक्के नालेसफाईच्या कामापैकी 75 टक्के नालेसफाई पावसाळ्याआधी केली जाते तर उर्वरीत 10 टक्के पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर 15 टक्के काम केले जाते. या पार्श्वभूमीवर, नालेसफाईच्या कामासाठी पालिकेने या वर्षी मिठी नदीसह प्रत्येक परीक्षेत्रानुसार नालेसफाईसाठी निविदा मागवल्या आहेत. सद्यस्थितीत करण्यात येणाऱया नालेसफाईच्या कामांसाठी 152 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामात पालिकेने गाळाच्या मेट्रीक टनाच्या हिशेबाने कामाची किंमत ठरवली आहे. कंत्राटदारांना काढलेला गाळ मुंबईबाहेर टाकावा लागणार आहे. स्थायी समितीने नालेसफाईच्या कामांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
शहरी भागासाठी येणारा खर्च
मुंबईत शहर भागात अंदाजे 32 किमी लांबीचे मोठे नाले असून यांच्या साफसफाईसाठी रुपये 12 कोटी 19 लाख इतका खर्च अपेक्षित आहे तर पूर्व उपनगर भागात असणाऱया मोठय़ा नाल्यांची सुमारे 100 किमी असून यांच्या साफसफाईसाठी रुपये 21 कोटी 3 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱया सुमारे 140 किमी लांबीच्या मोठय़ा नाल्यांच्या साफसफाईकरिता 29 कोटी 37 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.
शहर, पूर्व, पश्चिम उपनगरासाठी येणारा खर्च
शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱया सुमारे 20 किमी लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत कार्यादेश देण्यासदेखील स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली असून, यासाठी रुपये 89 कोटी 66 लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीची साफसफाई करताना गाळाच्या एकूण परिमाणाच्या 80 टक्के साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी व उर्वरित 20 टक्के साफसफाई ही पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी खात्याने दिली.