अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या ‘मुंबई डायरीज़ 26/11’ नावाच्या वेबसीरिजची घोषणा नुकतीच केली. ही वेबसीरिज 9 सप्टेंबरला स्ट्रीम होणार आहे.
निखिल आडवाणी द्वारा निर्मित आणि एम्मे एंटरटेनमेंटच्या मोनिशा आडवाणी आणि मधु भोजवानी यांची निर्मिती असलेल्या या मेडिकल ड्रामाचे दिग्दर्शन निखिल आडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांनी केले आहे. या सीरिजमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडिक्स आणि हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे नवी कथा मांडण्यात येणार आहे, ज्यांनी 2008 साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लोकांचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले होते.
यात कोंकणा सेन-शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धनवंतरी, सत्यजीत दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मुंबई डायरीज 26/11’ ही एक काल्पनिक मेडिकल कथेची वेबसीरिज असून त्या रात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानक बेतलेले आहे.