• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुंबईत भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी, नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 5, 2021
in घडामोडी
0
मुंबईत भाजपचाच पदाधिकारी बांगलादेशी, नवाब मलिक यांचे प्रत्युत्तर

उत्तर मुंबईतील भाजपच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी बांगलादेशी होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नवाब मलिक यांनी निदर्शनास आणले, असे प्रत्युत्तर मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत केला. मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना भाजपच आश्रय देत आहे आणि आमच्यावर आरोप करीत असल्याचे अस्लम शेख म्हणाले.

मालाड-मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान, बांगलादेश व पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिम नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जात असल्याचा आरोप भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केला. त्यांच्या या वक्तव्यावर कौशल्य विकास मंत्री नबाव मलिक व मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला.

मागील दहा वर्षांपासून मालाडच्या मालवणी भागात हिंदू धर्मीयांवर इतर धर्मीयांच्या दबावामुळे हिंदूंचे सातत्याने पलायन होत आहे. गेल्या पाच वर्षांत पंधरा हजार हिंदू मतदार कमी झाले तर बारा हजार मुस्लिम मतदार वाढले. मालवणी भागात रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी व पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांमार्फत ड्रग्जचा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी केला. मालवणीच्या छेडानगरमध्ये 108 हिंदू कुटुंबे वास्तव्यास होती, मात्र आता 60 हिंदू कुटुंबे शिल्लक राहिली आहेत असा दावा त्यांनी केला.

 

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

‘मुंबई सागा’ घेऊन संजय गुप्ता परतले

Next Post

सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात सूट मिळण्याची शक्यता

Next Post
सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात सूट मिळण्याची शक्यता

सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात सूट मिळण्याची शक्यता

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.