वास्तव जीवनात एकटे असताना अभिनेते, अभिनेत्री काय काय करतात हे चाहत्यांपर्यंत सोशल माध्यमांतूनच पोहोचते. यामुळे लोकांचे भरभरून मनोरंजन होते. असाच एक भन्नाट प्रयोग अभिनेत्री मीरा जोशी हिने केला आहे. तिने चक्क एका चालत्या पॅसेंजर ट्रेनमध्ये ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी बॅलन्ससाठी तिने ट्रेनच्या हॅण्डल्सचा छान वापर केला आहे.
सोशल मिडीयावर सक्रीय असणारी मीरा जोशी एका लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील कोचमध्ये थिरकताना पाहून गंमत वाटते. मुळातल्या ‘छैय्या छैय्या’ गाण्यात मलायका अरोरा चालत्या ट्रेनच्या छतावर शाहरूखसोबत थिरकली होती. पण मीरानेही ट्रेनच्या रिकाम्या कोचमध्ये केलेला हा डान्स तिच्या चाहत्यांना भलताच आवडतोय.
अभिनेत्री असण्यासोबतच मीरा एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिकाही आहे. तिच्या या मनमोहक डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. मीरा जोशी ही फक्त मराठी वाहिनीवरील ‘स्पेशल पोलीस फोर्स’ या मालिकेत पोलीस अधिकारी म्हणून दिसली होती.