लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अभिषेक देशमुख हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवीन नाही. ‘पसंत आहे मुलगी’ ही मालिका, ‘होम स्वीट होम’ हा मराठी सिनेमा आणि इतरही बऱ्याच प्रोजेक्ट्समुळे तो सर्वपरिचीत आहे. गुरुवारी त्याच्या लग्नाचा वाढदिवस… या पार्श्वभूमीवर त्याने आपली पत्नी अभिनेत्री कृतिका देव हिच्याविषयी एक भावनीक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, आणखी एक आनंदी वर्ष पूर्ण झाले. अजून कितीतरी अशीच आनंदी वर्षे येणार आहेत. त्या वर्षांचे स्वागत… चियर्स…!! कृतिका देव हीदेखील ‘पानिपत’ या गाजलेल्या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या परिचयाची आहेच. काही म्युझिक व्हिडीओही तिने केले आहेत.