स्टार भारत या मनोरंजन वाहिनीने चाहत्यांसाठी आपला ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ पुन्हा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच म्हणजे मार्चमध्ये या शोचा सीझन-२ सुरू होणार आहे. दिग्दर्शक कट प्रॉडक्शनचे राजन शाही आणि पर्ल ग्रे यांची निर्मिती असलेला हा कार्यक्रम जवळपास दशकानंतर पडद्यावर परत येतोय.
यामध्ये अभिनेत्री पूजा गौर तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे, तर अराहण बहल आणि अनुपम श्याम ओझा हेदेखील त्यांच्या त्यावेळच्या मुख्य भूमिकेतच दिसणार आहेत. दुसऱ्या सिझनबद्दल बोलताना पूजा गौर म्हणाली, घरी पुन्हा आल्याचा फिल मला वाटतोय. २००९ पासून हा शो घरोघरी प्रसिद्ध होता. स्टार भारत वाहिनीवर तो दुसऱ्या सत्रात परत येतोय याचा मला आनंद होत आहे.
या नवीन हंगामात काय नवीन पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता असेलच. पण तेही लवकरच स्पष्ट होईल, असेही ती म्हणाली.