घरात कोणी नसताना पत्नीचा गळा आवळून तसेच चेहऱयावर मारहाण करून पळून गेलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट – 3 च्या पथकाने पुण्यात पकडले. कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केली होती, असे आरोपीचे म्हणणे असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वरळीच्या बी.जी.खेर मार्गावर असलेल्या लेबर कॅम्पातील इमारत क्रमांक 3 मधील एका खोलीत शिखा मंडल (44) ही विवाहिता मृतावस्थेत सापडली होती. तिचा गळा आवळलेला होता तसेच कपाळ व नाकावर मारहाण केलेली होती. मात्र तेव्हापासून तिचा पती नारायण मंडल हा बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा युनिट-3 चे पथक समांतर तपास करीत होते.
आरोपी बंगालचा असल्याने तो पश्चिम बंगालला पळून जाईल, असा पोलिसांना संशय होता. पण तसे झाले नाही. तो पश्चिम बंगालला गेलाच नाही. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला असता नारायण हा राज्यात विविध ठिकाणी तसेच कर्नाटकात सतत जागा बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मग तो धागा पकडून शोधमोहीम हाती घेतल्यावर तो पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी पुण्यात जाऊन नारायण मंडलच्या मुसक्या आवळल्या.
सौजन्य : सामना