• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

होळयेचा गाराणा

होळी सणानिमित्त खास लेख

महेश केळुसकर by महेश केळुसकर
March 27, 2021
in भाष्य
0
होळयेचा गाराणा

व्हय देवा म्हाराजा तुया स्वामी समर्था, बाय माज्ये गावच्ये मर्यादा, तुका ह्या भरलेला श्रीफळ ठेवन तुजो मान काडलेलो आसा, तो मान्य करून घे.
लिंगा जैना ब्राह्मणा स्वामी समर्था, पाच पुरी बारा आकारा
आज धरतरीचो देव भूमीचो आकारी नि चौर्‍याऐंशीचो अधिकारी सामील होवन, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन, ह्यो होळयेचो सण आमी साजरो करताव..
तेवा ह्यो जो काय देवा आमचो महाराष्ट्र आजतागायत माणिक मोत्यांनी राखलंस, शेराक सवाशेर दिलंस, पाचाचे पंचवीस केलंस, तशीच राठी फुडे चालू ठेवन शेवाचाकरी करून घे म्हाराजा!
राजसत्तेचो देवचार, पूर्वसत्तेचो देवचार सामील होवन, ईठलाय नवलाय कोटकारी सामील होवन, बाराचे पूर्वज सामील होवन, गावडे वस गावडे पूर्वज सामील होवन, देवा श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेंच्यानी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवन ह्या महाराष्ट्र भूमीतल्या रयतेक सुखा-समाधानान जगण्यासाठी जा जा काय करूचा ता करून, फुडच्या काळातसुद्धा आपल्या महाराष्ट्र कुटुंबाची पताका उंच फडकावित ठेवायची आसा असा ठरवलेला आसा. तेंका येश आनि बरकत देवन सगळ्या मराठी राज्याची रखवाली कर महाराजा!
आज रवळनाथ पावणाय राजी होवन, बिरा म्हाराजा स्वामी समर्था तू सामील होवन ही जी काय सालाबादप्रमाणे होळयेच्या खुटार तुजी सगळी लेकरा जमान तेनी तुका हात जोडलेले आसत त्येंची शेवा मान्य करून घे म्हाराजा! देवा आज ही जी तुज्या महाराष्ट्राची बदनामी करीत, जेनी जेनी धुमशाना घालीत, आपली तुंबडी भरूचा राजकारण करूचा ठरवलेला आसा त्येंचे दात त्येंच्याच घशात घाल म्हाराजा! चतु:शीमेच्या भायरसून काळी टोपी घालनारा, काळी करणी करनारो ह्यो जो कोणी कवाडबावला आणून महाराष्ट्रात ठेवलेला आसा तेका धडो शिकवन, विधान परिषदेच्या आमदारांची यादी लवकरात लवकर मंजूर करूची सुबुद्धी दे म्हाराजा! उलट्या काळजाची कसाब करणी करनार्‍या टीव्ही चॅनलच्या चष्मेवाल्या अँकराची वाकडी शेपटी सरळ करून मुंबय पोलिसांची विनाकारण निंदा करणार्‍या नटीची छुट्टी करून टाक म्हाराजा! रोजच्या रोज आमच्या महाराष्ट्रावर भुकत र्‍हवणार्‍यांच्या मालकांच्या आंगार खाजकुयली टाकून तेंचो माज सटासट उतरवन टाक म्हाराजा!
भूत प्रेत समंधाक बांदून ठेवणार्‍या चतु:शीमेच्या अधिकार्‍या, म्हापुर्सा म्हाराजा, समर्था धरतीच्या आकारा, ह्या तुका महाविकास आघाडीचा अक्षरी ल्हाना ठेवलेला आसा ता मान्य करून घे म्हाराजा! सुज्ञान लेकराच्या हातान, अज्ञान लेकराच्या हातान, जर काय चूकभूल झाली आसात, तर या ल्हान्यापान्यावर राजी होवन सगळ्या राज्याची रखवाली कर म्हाराजा!
देवा तुजा टरबुजासारख्या लेकरू नरड्याच्या ईकारान शीक आसा नि ता सभागृहात नि भायर रस्त्यावर आनि टीव्हीच्या मायकान समोर पन वगीच आरड हुयेल मारीत आसता नि खोटा-नाटा रेटत आसता नि त्येच्या बायलेन पन आपल्या नरड्यात सूर नसताना महाराष्ट्राची क्रूर इटंबना चालवलेली आसा… त्या त्यांच्या इकारावर लवकरात लवकर वशेद सोदून दी म्हाराजा!
पंचाक्षरी विषयात आज ह्या ठिकाणी पंचशील ल्हाना ठेवलेला आसा. तेचो मान आज भरलेला फळ ठेवलेला आसा. ह्या फळार तू मर्यादा आज राजी होवन पंचाक्षरी गार्डी धोंड्या चतु:शीमेच्या अधिकार्‍या राजी होवन, ही जी काय करोनाची पनवती रयतेच्या पाठी लागली हा, ती ताबडतोबीन तुज्या ताब्यात घे म्हाराजा! तोंडार मुसक्या बांदा, हात धुवीत र्‍हवा, सणासमारंभात गर्दी करून करोनाचो फैलाव करू नकात अशी इनवणी, दातांच्ये कनये करून सरकार आनि डाक्टर करतहत. ती मनावर घेवन तिच्यापरमाण सगळे येवार करूची सद्बुद्धी आमच्या सगळ्या लोकांका दी म्हाराजा! न्हान न्हान पोरांचे शाळा परत सुरू होवंदेत, कालिजा उगडांदे, सगळ्यांचे परीक्षा येळेर होवंदेत, असा गाराणा तुज्या पायाकडे रुजू करून घे म्हाराजा! दोनव तोंडान बोलनार्‍या नि करोनाचा पन राजकारण करणार्‍यांका पायाबुडी घालून त्येंची दात कसाळ त्येंच्या घशात घाल म्हाराजा!
आज अवगत चाळेगत मोडात्री निरंकार ह्येंका गुळ-खोबरा, काजाळ-कुकू दिलेला आसा. मालवणी शब्दांच्या फुला फळांनी तुझी वटी भरलेली आसा. त्या परमाणा तू आज मर्यादा राजी होवन, ह्या हिंदुत्वाच्या नावावर जातीपातीत धर्माधर्मात भावाभावात कुटुंबाकुटुंबात विष पेरणार्‍यांचा, विश्वासघाताचा, खोटेपणाचा सगळा विष तुज्या ताब्यात घे. त्येंच्या कर्माची फळा तेंका भोगूक लाव आनि मुंबयच्या नावाक, महाराष्ट्राच्या नावाक काळा फासूक बगनार्‍यांका भस्मसात करून टाक म्हाराजा!
अष्टकोटी भुतांच्या भूपाळा, स्वयंभू बिरामणा दयाळा, चोर्‍याऐंशीच्या चाळ्या, भगतांच्या कृपाळा सालाबाद प्रमाणे ही तुझ्या बालगोपाळांनी होळी उबी केलेली आसा… ती फाल्गुन अमवाश्येक जळताना तिच्याबरोबर सगळी पनवती, सगळो हलकटपणा, दिल्लीवाल्यांचा सूडाचा राजकारन जळान जावंदेत आनि महाराष्ट्र धर्माची माया सगळ्यांच्याच मनात उमळान येवंदेत म्हाराजा!
व्हय म्हाराजा ऽऽ!!

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विडंबनकार आहेत)

Previous Post

महत्त्व जाणून सण साजरे करा!

Next Post

गोप्याचा शिवीग्रंथ

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025
भाष्य

टिंग टिंग भास्कर

May 22, 2025
भाष्य

चायवाला का डरला?

May 22, 2025
भाष्य

महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

May 22, 2025
Next Post
गोप्याचा शिवीग्रंथ

गोप्याचा शिवीग्रंथ

वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं

वेड लागायच्या पूर्वी सुचलेलं

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.