दिल्लीत नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातीलही नेते गेले होते. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्रातील महिला शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला आहे. 16 जानेवारीपासून तडवी हरयाणा-राजस्थान सीमेवर आंदोलन करत होता. काल जयपूर येथे त्यांचे निधन झाले. थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सिताबाई तडवी मूळच्या नंदूरबारच्या रहिवासी असून त्या गेली 25 वर्षे आदिवासी आणि शेतकर्यांच्या हक्कासाठी लढत होत्या. 16 जानेवारीपासून द्या दिल्लीत केंद्र सरकारविरोधात आंदोलनात आहेत. 26 जानेवारी रोजी झालेल्या ट्रॅक्टर परेडमध्येही त्या सहभागी होत्या. बुधवारी अचानक त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्यांना जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या 25 वर्षात त्यांनी आदिवासी आणि शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा दिला. अनेक वेळा त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. 2019 मध्ये वन सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी दिल्लीत झालेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.