आष्टी तालुक्यामध्ये गेली पाच दिवसापासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अद्याप यश आलेले नाही. आतापर्यंत तालुक्यातील तिघांचा बिबट्याने बळी घेत काही पाळीव प्राण्यांचा फडशाही त्याने पाडला आहे. सुरुडी येथे ज्वारीच्या पिकास पाणी देत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने पंचायत समिती सदस्या पती यांच्यावर हल्ला केला होता. त्यात मृत्यू झाला होता.
किन्ही येथे आजीआजोबा सोबत तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या स्वराज्य भापकर या चिमुकल्यावर अचानक बिबट्याने हल्ला करून ठार मारले. तसेच शनिवारी रात्री सहाच्या सुमारास मंगरूळ येथे मायलेकावर हल्ला केला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना होताच अवघ्या काही तासातच पारगाव (जो.) येथील शालनबाई शाहजी भोसले या गवत आणण्यासाठी शेतात गेल्या असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात त्यांच्या गळ्याला जखम झाली असून त्यांना उपचारासाठी नगर येथे पाठवण्यात आले आहे.
त्याच दिवशी रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दुसऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून करून ठार केल्याची घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्याची तालुक्यातील ही पाचवी घटना असून तिघा जणांना जीव गमवावा लागला आहे. बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. परंतु त्याला पकडण्यासाठी वानविभागास अद्याप यश आलेले नाही. तालुक्यामध्ये कोणत्या ना कोणत्या गावात बिबट्याचा संचार होत आहे. काही गावात त्याचे ठसे ही नागरकांनी पाहिली आहे. तालुक्यात नेमके किती बिबटे आहेत ? असा प्रश्न नगरिकांतून उपस्थित होत आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी अमरावती, संभाजीनगर, परळी, धारूर, पाटोदा येथील वनविभाचे पथकास पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये 125 कर्मचारी आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरेही लावण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हा नरभक्षक बिबट्या वनविभागाच्या तावडीत सापडलेला नाही.
सौजन्य : दैनिक सामना