अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गुंठेवारीचा प्रश्न अखेर मार्गी लागला. शहरातील 118 वसाहतींमधील सुमारे सवा लाख घरांना नियमित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे चार लाख नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
महानगरपालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंत बांधण्यात आलेली गुंठेवारीतील सुमारे सवा लाख घरे नियमित होणार आहेत. गेली अनेक वर्षे गुंठेवारीतील घरे नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. शिवसेनेकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता.
संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यांच्या या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.