मुंबईतील लालबाग येथे गणेश गल्ली परिसरात सिलिंडरचा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटात 20 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी हजर झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
20 people injured in a cylinder blast in Lalbaug area of Mumbai, Maharashtra. Two fire brigade and two jumbo tankers are on the spot: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) December 6, 2020
गणेश गल्लीतील साराभाई इमारत येथे हा सिलेंडरचा स्फोट झाला आहे. इमारतीतील बंद खोलीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुर्घटनेतील जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र, स्फोट कसा झाला? ती खोली कोणाची आहे? याविषयी अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही.
सौजन्य- सामना