आपल्या भारतीय संस्कृतीत कुठलेही नवे काम सुरू करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घेतला जातो. याच विचाराने सोनी मनोरंजन वाहिनीवर 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘क्यों उत्थे दिल छोड आए’ या मालिकेचे कलाकार पवित्र सुवर्ण मंदिरात म्हणजेच गोल्डन टेंपलला पोहोचले.
तेथे त्यांनी डोके टेकून बाबाजींकडून मालिकेच्या यशासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी अमृतसरला शूटिंग सुरू केले. 1947 मधल्या फाळणीच्या काळाचा संदर्भ दाखवणाऱ्या या मालिकेत अमृता (ग्रेसी गोस्वामी), वश्मा (आंचल) आणि राधा (प्रनेल) या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. देश स्वातंत्र्याच्या लढाईत दंग असताना या तिघी आपलं प्रेम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. मालिकेचे बहुतांश कथानक पंजाबमध्ये घडत असल्याने तेथेच शूटिंग करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
याबाबत बोलताना अभिनेत्री ग्रेसी म्हणाली, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच मला गोल्डन टेंपलमधल्या देवाचा आशीर्वाद घेता आला हे मी माझे भाग्यच मानते. आम्ही गुरुद्वारात प्रवेश केला तेव्हा एक वेगळीच शांती अनुभवायला मिळाली, असेही ती सांगते.