देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, ही म्हण तंतोतंत खरी ठरलीय ती दुबईत राहणाऱया 30 वर्षीय नवनीत संजीवन या तरुणाच्या बाबतीत. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात अनेकांनी नोकऱया गमावल्या. त्यापैकीच तो एक.
केरळचा रहिवासी असणारा नवनीत गेल्या 4 वर्षांपासून अबूधाबीत आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतो. एक दिवस त्याच्यावरही अचानक बेरोजगारीचे संकट कोसळले. नोकरी न मिळाल्यास अगदी मायदेशी परतण्याच्या तो विचारात होता. यादरम्यान 22 नोक्हेंबरला त्याने रॅफल तिकिट ऑनलाइन विकत घेतले. एक दिवस अचानक त्याला दुबई डय़ुटी फ्रीमधून 1 मिलियन यूएस डॉलरची लॉटरी जिंकल्याचा फोन आला अन् रातोरात त्याचे नशीब बदलले. हिंदुस्थानी रुपयांत ही रक्कम 7 कोटी 30 लाख रुपये असून चार जणांमध्ये लॉटरीची रक्कम वाटली जाईल.
लॉटरी जिंकणारा 171वा हिंदुस्थानी
डीडीएफ ड्रॉमध्ये अनेक वेळा हिंदुस्थानींचे नशीब फळफळले आहे. सात कोटींचे मेगा प्राईझ जिंकणारा नवनीत हा 171वा हिंदुस्थानी ठरला आहे.आपल्यावरील 27 हजार डॉलरचे कर्ज फेडून उर्वरित रकमेची बचत करणार असल्याचे त्याने सांगितले.
सौजन्य- सामना