बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने रविवारी फिटनेसचा आपला नवा व्हिडीओ ‘शी रॉक्स’ लाँच केला. एका ओटीटी माध्यमाच्या चॅनेलवर तो पाहाता येणार आहे. ‘रेस-3’मधली ही सुंदर अभिनेत्री आपल्या कमनीय बांध्यामुळे बॉलीवूडमध्ये खूपच नावाजलेली आहे. आपल्या या फिटनेस सिरीजमधून ती वेगवेगळ्या वर्कआऊट ट्रिक्स आणि टीप्स करून दाखवणार आहे.
आपल्या या सिरीजबद्दल ती स्वत: खूपच उत्साहात आहे. ती म्हणते, ‘शी रॉक्स’ हा फिटनेस प्रोग्राम लाँच केल्यामुळे मला खूपच आनंद होतोय. फीट राहणं हे सर्वांसाठीच एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे माझा हा फिटनेस प्रोग्राम सर्वांनाच आवडेल. ही सिरीज पाहून अनेकजण प्रोत्साहित होतील हेही नक्की… असे ती स्पष्ट करते. 5 भागांच्या या सिरीजचा पहिला भाग ‘शी रॉक्स कॉर्डिओ’ हा तिने लाँच केला आहे. एका पाठोपाठच्या भागांतून ती सोप्यापासून कठीणपर्यंत व्यायाम करून दाखवणार असून प्रेक्षकांनाही करायला सांगणार आहे.