श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी मंदिर परिसरात प्रवेशासंदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली असून या अटी जाचक असल्याचा दावा करत हायकोर्टात त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य शासन व साई संस्थानला नोटीस बजावली. याचिकेवर 5 मार्च रोजी पुढील सुनावणी अपेक्षित आहे.
हायकोर्टाने नवीन विश्वस्त नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश नगर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नाशिक व सह धर्मादाय आयुक्त, नगर यांची समिती गठित केली आहे. समितीने 19 डिसेंबर 2020 रोजी पत्रकारांना मंदिर परिसरात प्रवेशासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्याला परवानगी मिळण्यासाठी संभाजीनगर येथील खंडपीठात दिवाणी अर्जही दाखल केला आहे. हा अर्ज प्रलंबित आहे.
सौजन्य : दैनिक सामना